PMC : गणेशोत्सव 2023 करिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने तयारी पूर्ण

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव कालावधीत (PMC ) पुणे महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाकरिता जय्यत तयारी करण्याचे काम चालू आहे. पुणे महानगरपालिकेचे 15 क्षेत्रिय कार्यालये, विविध विभाग यांच्या वतीने सर्व स्तरावर तयारी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने 15 क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे.

त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांच्या गळती ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करण्यात आलेली आहे.

प्रमुख विसर्जन घाट खालीलप्रमाणे – PMC 

 

   संगम घाट नेने/आपटे घाट
  वृध्देश्वर घाट / सिध्देश्वर घाट ओंकारेश्वर
 अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ) पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे
   बापूघाट (नारायण पेठ)खंडोजी बाब चौक
   विठ्ठल मंदिर (अलका चौक)गरवारे कॉलेजची मागील बाजू
     ठोसरपागा घाट दत्तवाडी घाट
    राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर औंधगाव घाट
     चिमा उद्यान येरवडा बंडगार्डन घाट
   वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. 1 नदीकिनारपांचाळेश्वर घाट

Chinchwad : निषाद म्युझिक अँड डान्स अकॅडमी तर्फे पंडित नंदकिशोर कपोते यांचा सत्कार

आरोग्य विभागाच्या वतीने केलेली तयारी

आरोग्य खात्याकडे 4 मोबाईल क्लिनिक असून त्या गणेश विसर्जन मार्गावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मोबाईल क्लिनिक मार्फत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले जातील. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सर्व मोबाईल क्लिनिक सोबत 108 च्या अॅम्ब्युलन्स  सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संपूर्ण गणेशोत्सव दरम्यान पुणे महानगरपालिके अंतर्गत असणारे सर्व दवाखाने व रुग्णालयामध्ये मोफत औषधोपचार देण्यात येतील.

सर्व गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष यांना भेटून हस्त पत्रिकेचे वाटप करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणच्या गणेशोत्सव मंडप व विसर्जन हौद येथे आरोग्य विषयी बॅनर्स लावणेत येणार आहेत. टेम्पोद्वारे आरोग्य विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

पुणे महानगरनपालिका आरोग्य विभागाच्या वतीने पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेमार्फत नागरिक, युवक युवतीनां एच आय व्ही, एड्सबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून या विषयाची माहिती जास्तीत जास्त ठिकाणी देण्याकरिता पथनाट्याद्वारे 8 दिवसामध्ये 120 कार्यक्रम करून  जनजागृती करण्यात येणार आहे.

टेम्पोद्वारे डिस्प्ले, आय.ई.सी. अॅक्टिव्हिटी, handbil, पुस्तिका वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वतंत्र जनजागृती वाहन तयार करण्यात आले आहे. समुपदेशकांद्वारे नागरिकांना ठिकठिकाणी माहिती दिली जाणार आहे. नागरिकांकडून विचारणा करण्यात येणारे प्रश्न, शंका यांचेही निरसन केले जाणार आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने केलेले आवाहन

  • सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीत जाण्याचे टाळावे.
  • गुलाल चेहèयाला लावल्याने डोळ्यात गेल्यास अपाय होण्याची शक्यता असते. तसेच गुलाल मोठ्या प्रमाणात उधळल्याने हवेचे प्रदुषण होऊन नागरिकांना डोळ्याचे व श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते.
  • नागरिकांनी गुलाल चेहèयास लावण्याचे टाळून तो फक्त कपाळावर लावावा. गुलाल तोंडावर फेकू नये. डोळयात न जाईल याची काळजी घ्यावी.
  • मिरवणूक वेळी गुलाल उधळला जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी.
  • गुलाल डोळ्यात गेल्यास डोळे थंड पाण्याने स्वच्छ करावेत, डोळ्याची आग होणे व चुरचुरणे चालू राहिल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपाय योजना करावी.
  • नैसर्गिक रंगाचा वापर करुन तयार केलेल्या गुलालाचा वापर शक्यतो करण्यात यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.