Pune : प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिनी फटाक्यांची आतिषबाजी, पुणे महापालिकेकडून फटाके स्टॉल्सला परवानगी

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा (Pune) प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा दिवाळीप्रमाणे साजरा करावा, या भाजपच्या आग्रहानंतर पुणे शहरातही दिवाळीप्रमाणे फटाका स्टाॅल्स उभारणीला महापालिकेने परवानगी दिली आहे.

शनिवार पेठेतील वर्तक उद्यान परिसराच्या मागील बाजूस फटाका विक्री स्टाॅल्स उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तीन दिवस स्टाॅल्सला परवानगी देण्यात आली आहे.

फटाका स्टाॅल्सला परवानगी द्यावी, यासाठी शहर भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेवर त्यासाठी दबाव टाकल्याची चर्चा आहे. दरम्यान सोमवारी होणाऱ्या अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने संपूर्ण पुणे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळी प्रमाणे हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pimpri : राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त एक लाख घरांत ‘मंगल संच’

लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा हा देशातील मोठा सोहळा (Pune) असल्याने यानिमित्ताने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे.

प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा दिवाळीप्रमाणे उत्साहात साजरा करावा, अशी भूमिकाही घेण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीप्रमाणे शहरात फटाका स्टाॅल्सची उभारणी सुरू झाली आहे.

सोमवारी जल्लोष होण्याची शक्यता असल्याने फटाका स्टाॅल्सला परवानगी द्यावी, अशी सूचना पोलीस आयुक्त कार्यालयाने पुणे महापालिकेला केली. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना फटाके उपलब्ध होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.