Dehugaon Crime News: देहूगाव येथे भरदिवसा घरातून सव्वा अकरा लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे उघड्या दरवाज्यावाटे घरातून तब्बल 11 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला (Dehugaon Crime News) गेला आहे. हि घटना गुरुवारी (दि.23) सकाळी आट ते सायंकाळी सहा या कालावधीत देहुगाव येथील बाजारपेठ परिसरात घडली.

 

याप्रकऱणी नितीन गोपाळ मोरे (वय 58 रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Khed Crime News : रिक्षाचे नुकसान करत रिक्षा चालकाला मारहाण

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घारातून सकाळी आट ते सायंकाळी सहा या कालावधीत चोरट्याने उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील कपाटातील ड्रॉव्हरमधून 26.5 तोळे वजनाचे 11 लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास (Dehugaon Crime News)  करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.