Maval News : मावळात दुचाकीस्वराचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – मावळात दुचाकीस्वार तरुणाचा गाडी घसरून झालेल्या (Maval News ) अपघातात मृत्यू झाला आहे. हि घटना 18 मार्च रोजी मंगळूर गावात झाला असून उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.

 

Dehugaon Crime News: देहूगाव येथे भरदिवसा घरातून सव्वा अकरा लाखांचा ऐवज चोरीला

 

सतिश धंमपाल यादवसर (वय 23) असे मयत तरुणाचे नाव आहे. यावरून मयताविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सतिश हा त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून मंगरूळ गावाकडे जात असताना त्याची दुचाकी घसरली व तो खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु (Maval News ) असताना त्याचा मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.