Dehuroad : देहूरोड सेंट्रल ऑर्डनन्स डेपोच्या स्थलांतराला विरोध

खासदार श्रीरंग बारणे व खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन

 

एमपीसी न्यूज- देहूरोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (सीओडी) स्थलांतरित करण्यात येऊ नये अशी मागणी सीओडी देहूरोड कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतच्या मागणीचे निवेदन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सरचिटणीस चंदन आल्हाट यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे व खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात सोमवारी (दि. 20) भेट देऊन निवेदन सादर काण्यात आले. यावेळी बाळासाहेब चव्हाण, हिरामण बालघरे, भरत कामठे, मनोज शितकल, विकास बालघरे, राहुल शिनलकर, अभिजीत मुंगसे, संजय डुमडे उपस्थित होते.

देहूरोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपो स्थलांतरित करण्यात येणार असून त्यामुळे सर्वसामान्य स्थानिक कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सेंट्रल ऑर्डनन्स डेपोबद्दल प्रश्न उपस्थित करू तसेच या विषयावर संरक्षण मंत्रालयाशी आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यांनी देखील संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.