Dehuroad : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) दुपारी अडीचच्या सुमारास सेट ज्यूड स्कूल समोर घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 45 वर्षीय वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमनसिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या बारा वर्षांच्या मुलीला आरोपीने अमिश दाखवून पळवून नेले. अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. रात्री उशिरा मुलगी घरी आल्यानंतर तिने हा प्रकार घरी सांगितला. त्यावरून पीडित मुलीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीला अद्याप अटक केली नाही. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.