Pimpri : अधिका-यांचे गोपनीय अहवाल पाठविण्यास विभागप्रमुखांकडून विलंब

प्रशासनाने विभागप्रमुखांना पाठविले स्मरणपत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणा-या ‘अ’ ते ‘क’  संवर्गातील अधिकारी, कर्मचारी, तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांचा गोपनीय अहवाल 30 जूनच्या आतमध्ये पाठविणे आवश्यक होते. परंतु, अनेक विभागातील कर्मचा-यांचे अहवाल आले नाहीत. त्यांनी 20 ऑगस्टपर्यंत अहवाल पाठवावा असे स्मरण पत्र प्रशासनाने विभागप्रमुखांना पाठविले आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणा-या  अ’ ते ‘क’  संवर्गातील अधिकारी, कर्मचारी, तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांचा 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या आर्थिक वर्षातील गोपनीय अहवाल प्रशासनाने विभागप्रमुखांकडून मागविली होता. 30 जूनच्या आतमध्ये अहवाल पाठविणे आवश्यक होते.

परंतु, अनेक विभागप्रमुखांनी विभागातील कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल प्रशासनाला पाठविले नाहीत. ही बाब योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी कर्मचा-यांचे गोपणीय  अहवाल पाठविले नाहीत., त्या विभागप्रमुखांनी 20 ऑगस्टपर्यंत गोपणीय अहवाल पाठवावेत, असे स्मरण पत्र प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी विभागप्रमुखांना पाठविले आहे.

20 ऑगस्टपर्यंत गोपणीय अहवाल न पाठविल्यास ही बाब कारवाईसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.