Delhi : यमुनेच्या पाणी पातळीत वाढ; बऱ्याच वर्षांनी दिल्लीत मुसळधार पाऊस, लोकांच्या घरात पाणी

एमपीसी न्यूज – दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळीत (Delhi) रात्री वाढ झाली. ज्यामुळे दिल्लीतील काही भागात रात्री घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांची फार गैरसोय झाली आहे. हरियाणातील हथनीकुंड बॅरेजमधून नदीत पाणी सोडणे सुरू असल्याने आज सकाळी 7 वाजता यमुना नदीच्या पाण्याची पातळी 208.46 मीटर होती. सध्याची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा तीन मीटरने जास्त आहे.

केजरीवाल सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती, की बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग थांबवावा, परंतु केंद्राने उत्तर दिले की बॅरेजमधून जास्तीचे पाणी सोडावे लागेल. उत्तर भारतामध्ये मुसळधार पावसामुळे हे बॅरेज पूर्ण भरलेले आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील रिंगरोड जलमय झाला आहे.

तसेच, मजनू का टिळा आणि काश्मिरी गेटला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. हे ठिकाण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानापासून आणि दिल्ली विधानसभेपासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे.

Pune : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

यमुनेच्या पाण्याची पातळी आता सर्वकालीन उच्चांकावर आहे. या पावसाळ्यामध्ये, दिल्लीत बऱ्याच वर्षांनी एवढा पाऊस झाला आहे. लोकांना निगमबोध घाट स्मशानभूमीचा वापर न करण्याचा सल्ला  (Delhi) देण्यात आला आहे. कारण जुनी दिल्ली पूरस्थितीमुळे सर्वात जास्त प्रभावित झाली आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तब्बल 12 पथके बचाव कार्यासाठी तयार आहेत. केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे, की हरियाणा बॅरेजमधून पाण्याचा प्रवाह दुपारी 2 वाजल्यापासून कमी होणे अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.