Prime minister Modi : पंतप्रधान मोदींनी मुस्लीम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज : बुधवारी (दि.10 एप्रिल) रोजी रात्री चंद्राचे दर्शन झाल्यानंतर जामा मशिदीच्या वतीने आज (दि.11) रोजी ईद साजरी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी देशभरातील मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आज ईद -उल फित्र अर्थात रमजान ईद संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. जामा मशिदीत मुस्लीम बांधवांनी आज (दि.11) सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच नमाज पठणाला सुरुवात केली. ईद हा बंधुभावाचा आणि आनंदाचा सण आहे. देशभरातील मुस्लीम बांधव रमजान ईदची नमाज अदा करून एकमेकांना मिठी मारत शुभेच्छा देत असून एकमेकांच्या घरी जाऊन मिठाईचा आस्वाद घेत असतात.

Chinchwad : रमजान ईद निमित्त पोलीस आयुक्तांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

या पवित्र सणानिमित्त पंतप्रधानांनी (Prime minister Modi)  मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत हा सण आपल्याला मानवजातीच्या भल्यासाठी सामूहिक कल्याण आणि समृद्धीची भावना पुढे नेण्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा देईल असे ‘ट्वीट’ केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.