Chinchwad : रमजान ईद निमित्त पोलीस आयुक्तांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

एमपीसी न्यूज – रमजान ईदचा सण आज गुरुवारी (दि. 11) सर्वत्र साजरा होत ( Chinchwad)  आहे. यानिमित्त मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज पठण करतात. पिंपरी चिंचवड शहरात देखील हा सण उत्साहाने साजरा होत आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चिंचवड येथील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

चाफेकर चौक चिंचवड येथील ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा केली जाते. रमजान ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून चिंचवड येथील ईदगाह मैदानावर मागील काही दिवसांपासून तयारी केली जात होती. गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजता पहिली नमाज सुरू झाली. यावेळी सुमारे 2200 बांधवांनी नमाज पठण केले.

Talegaon Dabhade : बॅनर फाडल्याचा जाब विचारत तरुणाला बेदम मारहाण, एकाला अटक

त्यानंतर, दुसरी नमाज साडेनऊ वाजता सुरू झाली. यावेळी सुमारे 1200 बांधवांनी नमाज पठण केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांचा संवाद साधून त्यांना सामाजिक सलोखा वाढविण्यावर सर्वांनी भर द्यावा, असे सांगितले.

दरम्यान, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी चिंचवड येथील ईदगाह मैदानावर उपस्थित होते.

रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान चिंचवड येथे येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पोलिसांनी देखील चोख नियोजन केले. ईदगाह मैदानाकडे येणाऱ्या ( Chinchwad)  रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.