Dapodi : वाढत्या डासांबाबत उपाययोजना करण्याची मागणी

विशाल वाळुंजकर यांचे प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – दापोडी, फुगेवाडी मध्ये लोकवस्ती अधिक आहे. याच भागातून पवना नदी वाहते. नदीमध्ये असणारा पाला व अनेक ठिकाणी असणारा दुर्गंधी कचरा (Dapodi) यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. तर याच वाढत्या डासांबाबत उपाययोजना करण्यासाठी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. 

निवेदनामध्ये विशाल वाळुंजकर यांनी स्वच्छता व आरोग्य विभागाला योग्य वाटतील त्या उपयोजना करायची विनंती केली आहे. जागोजागी औषध व धूर फवारणी करून आपण या डासांच्या संख्येला कमी करू शकतो. जिथे अस्वच्छता आणि ओलसर भाग असतो तिथे डासांची अंडी होतात आणि त्यातून डास जास्त वाढतात. भाजपचे सचिव विशाल वाळुंजकर यांचे हेही म्हणणे आहे की औषध आणि धूर फवारणी करताना कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतो. तर तो हलगर्जीपणा झटकून कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे औषध व धूर फवारणी करावी त्याच्याने डास आणि इतर किडे कमी होतील.

Mamurdi News : महापालिका मामुर्डीचा 12 मीटर रस्ता कधी विकसित करणार

डासांच्या संख्येमुळे सामान्य जनतेला भरपूर आजारांना सामोरे जायला लागू शकते. भारतात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फिलारियासिस, व्हायरल एंसिफिलाइटिस हे (Dapodi) डासांमुळे होणारे, सर्वाधिक आढळून येणारे संसर्ग आहेत. हे रोग नसते घातकच नसून जीव घेणे ही आहेत. तर हे रोग टाळण्यासाठी सर्वांना योग्य ती सावधगिरी घ्यावी लागेल आणि स्वच्छता राखावी लागेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.