Mamurdi News : महापालिका मामुर्डीचा 12 मीटर रस्ता कधी विकसित करणार?

एमपीसी न्यूज – मामुर्डी येथील सर्व्हे नंबर 14, 15 व 17 पैकी मधील 12 मीटर रस्ता (Mamurdi News) विकसित करण्यास विलंब होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा रस्ता महापालिकेने तातडीने विकसित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मामुर्डी येथील सर्व्हे नंबर 14, 15 व 17 पैकी मधील 12 मीटर रस्ता विकसित करण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. या रस्त्याचा काही भाग सहा जणांच्या मालकीच्या जागेमध्ये आहे. या जागा मालकांनी 7 जुन 2022 रोजी नगररचना विभागात झालेल्या बैठकीमध्ये प्रपत्र ‘अ’ने रस्त्याची जागा महापालिकेकडे ताब्यात देण्याबाबत संमती दर्शविली आहे.

त्यासाठी जागा मालकांनी महापालिकेच्या ताब्यात जागा देण्याकरिता नजीकच्या काळातील सातबारा, जागेचे खरेदी खत उतारा नगररचना विभागाकडे लवकरात लवकर सादर करण्याची नोटीस दिली आहे. जागा ताब्यात येताच रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे मामुर्डी परिसरातील लोकांची गैरसोय दूर होईल. महापालिकेने लवकरात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन रस्त्याचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जीएन हाईट्स प्रोजेक्टचे संचालक मिठालाल जैन म्हणाले, डेव्हलपमेंट चार्ज तीन कोटी रुपये भरले आहेत. त्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये रस्ता करुन दिला पाहिजे, असा महापालिकेचा नियम आहे. पण, दहा वर्षे झाली. तरी, अद्यापही रस्ता विकसित केला नाही.

Shivchhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात हरकती नोंदवा; प्राथमिक छाननी अहवाल प्रसिद्ध

महापालिका नगररचना विभागाचे (Mamurdi News) उपअभियंता उमेश मोने म्हणाले, रस्ता विकसित करण्यासाठी जागा ताब्यात घेण्याकरिता जागा मालकांना नोटीस दिली आहे. दोन दिवसांपूर्वी दुसरी नोटीस देखील दिली आहे. जागा लवकर ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.