IPL 2023 – गुजरात टायटन्सचा आयपीएल 2023 मधला 3 विजय; लो स्कोरिंग सामन्यात पंजाबवर मात

एमपीसी न्यूज – आयपीएल सामन्यामध्ये (IPL 2023) गुजरातने पंजाब किंग्सला 13 एप्रिल रोजी झालेल्या 6 बळी आणि 1 चेंडू राखून हरवले. मोहाली येथील पीसीए मैदानावर गुजरातने स्वतःचा या आयपीएल 2023 चा तिसरा सामना जिंकून आयपीएल चषकावर ठोस दावा ठेवला आहे. आयपीएल 2023 च्या 18व्या सामन्यामध्ये गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना पंजाबचे सलामीवीर कमी पडले आणि पंजाबला पारी बांधायचा पाया मिळाला नाही. फॉर्ममध्ये असणारा कर्णधार शिखर धवन फक्त 8 धावांवर बाद झाला तर प्रभसिमरन सिंग तर स्वतःचे खाते ही उघडू शकला नाही. भाणुका राजपक्षा (20), जितेश शर्मा (25) आणि सॅम करन (22) या तिघांच्या मंदगती फलंदाजीमुळे पंजाबला हवी ती चालनाच मिळाली नाही.

मॅट शॉर्टच्या 36 आणि शाहरुख खान कडून झालेल्या 22 धावांच्या ताबडतोब फलंदाजीमुळे पंजाब 153 अश्या आयपीएलच्या मनाने फारच कमी धावसांख्येवर पोहोचले. गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, आजारी जोसेफ आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. वेगवान गोलंदाज मोहित शर्माने गुजरात टायटन्सकडून दोन बळी घेतले.

154 या लहान धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचे (IPL 2023) सलामीवीर फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांवर बरसले. रिद्धिमान सहा (30) आणि शुभमन गिल (67) यांच्या तुफानी खेळीमुळे गुजरातने हा सामना निवांतपणे जिंकला असे आपण म्हणू शकतो. भलेही कागदावर असे दिसत असेल की गुजरातने हा सामना फक्त एक चेंडू राखून जिंकला तरीही सामन्यांमध्ये गुजरात कधीच नियंत्रणाच्या बाहेर दिसले नाहीत. पंजाब कडून गोलंदाजी करताना अर्षदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि सॅम करन या सर्वांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Mamurdi News : महापालिका मामुर्डीचा 12 मीटर रस्ता कधी विकसित करणार

गुजरात टायटन्स हा आयपीएल 2023 मध्ये कागदावर एक मजबूत संघ म्हणून उतरला आहे. आणि त्यांची कामगिरी ही तशीच चालू आहे. कालच्या सामन्यांमध्ये कर्णधार हार्दिक पांड्या परतल्याने गुजरात कुठेही दुर्मिळ दिसत नाही आहे. परंतु पंजाब किंग्स हे कर्णधार शिखर धवन शिवाय फलंदाजी मध्ये अतिशय दुर्मिळ दिसत आहे. दुखापतींच्या धक्क्यानी त्रासलेले पंजाब किंग्सला विद्यमान खेळाडूच पुढाकार घेऊन वाचवू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.