Dighi : दिघी येथे अनधिकृत बांधकामप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अनधिकृत बांधकाम धारकांविरोधात महापालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे एका बाजुला मुख्यमंत्री अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याचे आश्‍वासन देत असताना शहरातच चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनिल मनोहर मेटांगे, नम्रता देवेंद्र पाटील, सचिन भीमराव लांडे व अतुल खडसे यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52,53 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका अधिकारी अनिल देवराम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

यामध्ये संबंधीत चौघानांही महापालिकेने 21 ऑक्‍टोबर रोजी नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांना संबंधित अनधिकृत बांधकाम 3 नोव्हेंबर पर्यंत अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते मात्र तरीही त्यांनी बांधकामे पाडली नसल्यामुळे त्यांच्यावर महापालिकेने दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मध्यतंरी सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत होणार असल्याचे राजकारण्यांनी आश्‍वासन दिल्यामुळे महापालिका देखील कारवाई संदर्भात संभ्रमात होती. मात्र सर्वोच्च न्यालयाने अनधिकृत बांधकामे अनधिकृतच राहणार असा निर्वाळा दिल्यानंतर महापालिकेने गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरु केले आहे. महापालिका केवळ नोटीस बजावत होती मात्र त्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई थंडावली होती. मात्र शनिवारी (दि.3) केलेल्या कारवाईमुळे पुन्हा अनधिकृत बांधकामावर कायद्याचा हातोडा पडणार आहे. यात विरोधाभास म्हणजे मुख्यमंत्री एका बाजुला नागरिकांना आश्‍वासने देत असताना दुसऱ्या बाजुला नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.