Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करण्यात आला.

दिलीप डोळस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक दिवस आपल्या रिक्षामधून नागरिकांना मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली. वाढदिवसानिमित्त तळेगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, वृक्ष प्राधिकरणचे सभासद यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली.

तसेच संध्याकाळी तळेगावच्या ‘कलापिनी’ संस्थेतर्फे त्यांचा जाहीर कृतज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे’ या सामाजिक संस्थेतर्फे त्यांना’ ‘मानद सभासदत्व’ प्रदान करण्यात आले. त्यावेळी डोळस यांनी ‘अवयवदान’ मोहिमेचा भाग म्हणून अवयवदान प्रतिज्ञा नोंदणी अर्ज भरला. विविध सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी डोळस यांना निरोगी दीर्घायुष्य मिळो तसेच त्यांच्याकडून असेच सामाजिक कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.