Exit of Disha Salian : दिशाच्या आकस्मिक मृत्यूमुळे शंकेचे वादळ

Disha Salian's exit: A storm of doubt about Disha's sudden death दिशा बॉलिवूड जगातील एक प्रतिभावान पब्लिक रिलेशन मॅनेजर होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी याबाबत पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. करोनाची मृत्यू झालेल्यांबरोबर आत आत्महत्या करण्या-यांची संख्या देखील वाढत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी याबाबत पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी दिशाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवला असून भावी नव-याचा जबाब नोंदवणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिशा गेल्या काही दिवसांपासून निराश होती आणि काल ती दोघांना भेटली होती.

दिशाच्या मृत्यूची माहिती ‘फुकरे’मधील अभिनेता वरुण शर्माने सोशल मीडियाद्वारे दिली. दिशा सध्या वरुण शर्मासाठी काम करत होती. त्यापूर्वी तिने सुशांत सिंहसाठी काम केले होते. आता तिच्या निधनाची बातमी ऐकून सुशांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्याने या पोस्टद्वारे दिशाला श्रध्दांजली वाहिली आहे.

तसेच वरुण शर्माने देखील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. मला हे खरं वाटत नाही. खूप आठवणी आहेत. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे. कामात नेहमी येणाऱ्या अडथळ्यांना ती एकदम सहजपणे सामोरी जायची. तिची खूप आठवण येईल. माझा अजूनही विश्वास बसत नाही की ती आपल्यामध्ये नाही’ असे वरुणने पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारती सिंहने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तिने दिशाचा फोटो शेअर करत त्यावर रडण्याचे इमोजी वापरले आहेत. तिने भारती सिंह आणि ऐश्वर्या राय बच्चनसाठी देखील काम पाहिले आहे.  दिशा बॉलिवूड जगातील एक प्रतिभावान पब्लिक रिलेशन मॅनेजर होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.