Alandi : आळंदीमधील रस्त्यावरील ब्लॉक्स निघाल्याने वाहनांच्या रहदारीस त्रास

एमपीसी न्यूज : आळंदी येथील नृसिंह मठाकडे (Alandi) जाणाऱ्या रस्त्यावरचे मोठ्या प्रमाणात ब्लॉक्स निघाल्याने त्या रस्त्यावर खड्डा पडून तेथून रहदारी करणाऱ्या वाहनस्वारांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकी स्वारांची वर्दळ येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असते.

तेथील रस्त्यावरील ब्लॉक्स निघून तेथे खड्डा निर्माण झाला आहे. तेथून रहदारी करताना दुचाकी स्वारांच्या पाठीच्या मणक्याला इजा होऊ शकते. यासाठी प्रशासनाने त्वरित येथील ब्लॉक्स योग्य पद्धतीने बसवावेत, असे मत इंद्रायणी फाऊंडेशनचे विठ्ठल शिंदे यांनी व्यक्त केले.

Pimpri News : कामगारांना 5 लाखाच्या ‘विमा’चे वाटप

तेथे विविध केबल लाईनसाठी वेळोवेळी ब्लॉक्स काढल्याने (Alandi) नेहमीच त्या रस्त्यावर खड्डा असल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळते. चाकण चौकातील मुख्य रस्त्यावरच सिमेंटच्या भेगा पडल्याने त्याची दुरुस्तीची मागणी होत आहे.

तसेच, भैरवनाथ चौकातील भैरवनाथ मंदिरामागील मुख्य रस्त्यावरील ब्लॉक्स निघाल्याने तिथेही खड्डा निर्माण झाला आहे. गतिरोधकाजवळच खड्डा असल्याने वाहने खड्डयातच काही सेकंद अडकून बसतात. वाहन स्वारांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे येथील रस्त्यावरील ब्लॉक्सची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आळंदीकर नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.