Pimpri News : कामगारांना 5 लाखाच्या ‘विमा’चे वाटप

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या (Pimpri News) वाढदिवसानिमित्त धोकादायक काम करणाऱ्या कामगारांना तसेच संघटनेच्या महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोफत पाच लाखाच्या अपघाती उपचार विम्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, निमंत्रक नाना कसबे, राज्य उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, आबा शेलार, ओमप्रकाश मोरया, व्यंकट निरगुडे, अंबालाल सुखावाल आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचा सर्वात अधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जयंत पाटील यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र राज्यांमध्ये संघटन कौशल्याच्या माध्यमातून विविध समाजातील विविध घटकांच्या लोकांना एकत्रित घेऊन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे व्हिजन आहे.

Chinchwad Bye-Election : भाजपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयश; वंचितचा आरोप

परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे जोडून पक्षाला विशिष्ट उंचीवर नेण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे . त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष असे उपक्रम राबवण्याचा संकल्प महासंघाच्या (Pimpri News) पदाधिकारी यांनी केला आणि आज तो प्रत्यक्षामध्ये आणला आहे. अपघातानंतर उपचारासाठी हा विमा महत्वाचा ठरणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.