Chinchwad Bye-Election : देवांग कोष्टी समाजाचा भाजपला पाठिंबा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना देवांग कोष्टी समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. (Chinchwad Bye-Election) त्याबाबत संघटनेच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे.

देवांग कोष्टी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश तावरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “देवांग कोष्टी समाजाचे सुमारे पाच हजार मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहण्यास आहेत. जगताप कुटुंबाचेही आम्हाला कायम सहकार्य लाभले आहे.

Chinchwad Bye-Election : भाजपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयश; वंचितचा आरोप

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाजाच्या (Chinchwad Bye-Election) अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी केलेल्या मदतीस स्मरून आम्ही सर्वांनी एकमताने ठराव करून पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.