Ecofriendly ganeshotsav :संतनगर मित्र मंडळ जपतय 16 वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा; यावर्षी औदुंबर वृक्षात साकारली श्रीगणेशाची प्रतिकृती

एमपीसी – मी फक्त दगडात नाही, मी फक्त मंदिरात नाही, तर मी प्रत्येक वृक्षात आहे, चराचरात आहे ! असा संदेश देणारा वृक्षगणेश संतनगर मोशी-प्राधिकरण येथील संतनगर मित्र मंडळाने साकारला आहे.

Maharashtra : आता शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’

संतनगर मित्र मंडळ व भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल उर्फ नाना वाळुंज, यांच्यासह कु. सेजल वाळुंज व शोभाताई फटांगडे यांच्या निर्मिती कलाकृतीतून औदुंबर वृक्षामध्ये गणेशमूर्ती साकारली व फळभाज्यांचा हार घालून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे गणपती. कुणी सुखकर्ता म्हणतं तर कुणी लंबोदर. कुणी ओमकार तर कुणी भालचंद्र. बाप्पाची अनेक रुपं आहेत. भक्तांच्या हाकेला धावणारा, विघ्न दूर करणा-या गणरायाच्या आगमनाची सा-यांना प्रतीक्षा असते. तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा, अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात, आयुष्य त्याच्या सोंडेइतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. हा उत्सव पर्यावरणपुरक व प्रदूषणमुक्त साजरा करावा, अशी गणरायांचरणी प्रार्थना अशी भावना लोकांसाठी मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

यावर्षीही सर्वांनी मिळून पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी गणेश उत्सवात नेहमीप्रमाणे प्लास्टिक चा वापर टाळूया. विविध प्रकारची सजावट करण्यासाठी झाडे, फळे, फुले, धान्य, आयुर्वेदिक गोष्टी, कमीतकमी कापड वापरून, विजेचा कमी वापर करूया, तसेच जास्तीतजास्त दिवे, आणि पणत्यांचा वापर करण्याची हाक मंडळाच्या वतीने लोकांना देण्यात आली आहे.

या उत्सवाच्या माध्यमातून वीज वाचवा, झाडें लावा, पाणी अडवा, पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा, रासायनिक गोष्टींचा वापर टाळा, वसुंधरा वाचवा तरच आपण वाचणार , मी फक्त दगडात नाही, मी फक्त मंदिरात नाही, तर मी प्रत्येक वृक्षात आहे, चराचरात आहे, संदेश देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सव मानवासाठी, जीवसृष्टीसाठी हितकारी आहे. या गणेशोत्सवाचे औचित्य साधून निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प प्रत्येक गणेश मंडळाने आणि गणेशभक्तांनी करावा, असे अवाहन संतनगर मित्र मंडळ व भूगोल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रदुषणमुक्त-पर्यावरणयुक्त आपला भाग, आपले शहर, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश, आपली भुमातावसुंधरा, असे सूत्र देखील संतनगर मित्र मंडळ व भूगोल फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. तसेच भजन, कीर्तन असे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.