NCP : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला काँग्रेस अध्यक्षपदी ज्योती निंबाळकर यांची निवड

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP) पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस अध्यक्षपदी ज्योती निंबाळकर यांची निवड करण्यात आली. महिला प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालय येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.

Pune Politics : वेळप्रसंगी पुण्याच्या पालकमंत्रिपदी नको दोन्ही ‘दादा’, करा आम्हास वादा!

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाल्या की “शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारे नुसार देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने दडपशाही करणाऱ्या भ्रष्टाचारी भाजप सरकारच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभे झाल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.

जनतेच्या मनात काय आहे हे येवला आणि बीड येथील झालेल्या सभेत जनतेने दाखवून दिले आहे. लोकशाही वाचवण्याच्या या लढाईमध्ये राज्यातील महिला, युवक-युवती हे पवार साहेब यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.”

यावेळी बोलताना नवनिर्वाचित महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या “आमची थेट लढाई ही भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपसोबत असून येणाऱ्या काळात शरद पवार साहेब, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारधारेनुसार महिला संघटना मजबूत करणार असून,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि कार्यकारी समिती मधील सदस्य व शहरातील महिला यांच्या साथीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेतून हद्दपार करत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकवणार आहोत. या दृष्टीने राष्ट्रवादी महिलाआघाडी काम करणार असून असल्याचे त्यांनी सांगितले.

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते,सचिन निंबाळकर, विशाल शिरसागर,विशाल शिंदे, शाहिद शेख,अशोक हरपळे,सुवर्णा वाळके,कविता देवकर,दिपाली पारखे,मनीषा निंबाळकर उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.