Pimpri News : पवना धरण 100 टक्के भरले! पण…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे (Pimpri News) पवना धरण तुडूंब भरले आहे. धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. पण, महापालिका प्रशासन एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यावर ठाम आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. जुलै महिन्याच्या दुस-या पंधरवाड्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली.

1 जून पासून धरण परिसरात 2162 मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात 80 टक्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा 100 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त पाऊस झाला.

NCP : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला काँग्रेस अध्यक्षपदी ज्योती निंबाळकर यांची निवड

धरणात 100 टक्के पाणीसाठा झाल्याने शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा होईल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, दररोज पाणीपुरवठा केल्यास चढावरील भागात पाणी जात नाही. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे सर्वांना समान पाणी मिळत आहे.

त्यामुळे दिवसाआडच पाणी पुरवठ्यावर प्रशासन ठाम आहे. त्यामुळे दररोज (Pimpri News) पाणीपुरवठ्यासाठी शहरवासीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत धरण 100 टक्के राहिल्यानंतर 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पाणी पुरेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे. दरम्यान, समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. साडेतीन वर्षे झाले, तरी पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.