Maharashtra Rain : पुण्यासह महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता नाहीच!

एमपीसी न्यूज : पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात पुढील (Maharashtra Rain) पाच दिवसांत लक्षणीय पाऊस होणार नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले.

ईशान्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, त्याचा फारसा फायदा झाला नाही, असे हवामान विभागाने सांगितले.

Pimpri News : पवना धरण 100 टक्के भरले! पण…

ऑगस्टच्या सुरुवातीपासून, पुणे जिल्ह्यात सरासरी 209.8 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 73.5 मिमी पावसाची 65 टक्के तूट नोंदवली गेली आहे. पुणे आणि आसपासच्या प्रदेशात पुढील काही दिवस ढगाळ (Maharashtra Rain) वातावरण आणि हलका  पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिना महाराष्ट्रासाठी विशेषतः कोरडाच गेला. कारण राज्यात केवळ 58 टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सरासरी 207.1 मिमीच्या तुलनेत 86.4 मिमी पाऊस झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.