Talegaon : तळेगाव स्टेशन येथे प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथे प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल 7 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत असणार आहे. दरम्यान या बदलाबाबत नागरिकांना सूचना आणि हरकती पाठवता येणार आहे. नागरिकांनी वरील कालावधीत पिंपरी चिंचवड वाहतूक विभागात आपल्या सूचना आणि हरकती कळवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. 
तळेगाव स्टेशनकडून पोस्ट ऑफिसकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावर केवळ एकेरी वाहतूक होईल. मुंबईकडून चाकणकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. तळेगाव स्टेशन येथे पोस्ट ऑफिसजवळ 20 फूट रुंदीचा पूल आहे. या पुलावरून एका वेळी केवळ दोन वाहने जाऊ शकतात. तळेगाव स्टेशनकडून पोस्ट ऑफिस चौकाकडे येणाऱ्या वाहनांमुळे पोस्ट ऑफिस चौकात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांनी शिवाजी चौकातून सिंडिकेट बँक चौकातून इच्छित स्थळी जावे.
नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचेही वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like