Talegaon : तळेगाव स्टेशन ते कलश मंदिर चैत्र परिपाठी (पंचतिर्थ) संपन्न

एमपीसी न्यूज –  तळेगाव स्टेशन श्री शांतिनाथ आदिनाथ जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ द्वारा आयोजित व आचार्य अक्षयबोधीसुरीश्वरजी म.सा., आचार्य महाबोधीसुरीश्वरजी म.सा. आदिठाना एवं प. पु. साध्वीजी जिनकृपाजी म.सा. आदिठाना यांच्या ( Talegaon )  सानिध्यात श्री शांतिनाथ मंदीर, श्री आदिनाथ मंदिर, श्री जीरावला पार्श्वनाथ मंदीर – श्री महावीर स्वामी व श्री कलश मंदीर अशी पंच तिर्थ चैत्र परिपाठी संपन्न झाली.

या चैत्र परिपाठीचे आयोजन करण्यासाठी तळेगाव स्टेशन जैन सकल संघ, नुतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभ शांती विहार सेवा ग्रुप, श्री जैन महीला मंडळे उपस्थित होते.

Kamshet : पवनानगर रोडवर अपघातात तरसाचा मृत्यू

या चैत्र परिपाठीचे मुख्य लाभार्थी- शा. हिम्मतमलजी हजारीमलजी राणावत व तसेच सह लाभार्थी शा. प्रकाशचंदजी केसरीमलजी, शा. लालचंदजी ताराचंदजी, शा. चुनिलालजी रामाजी, शा नरेशकुमार घेवरचंदजी, शा. तेजपालजी शामचंद परिवारांना संघवी पदवी बहाल करण्यासाठी तळेगाव स्टेशन नुतन ट्रस्ट मंडळाच्या वतीने त्यांना फेटा, माळ, श्रीफळ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच श्री जिरावला पार्श्वनाथ ट्रस्ट व श्री कळस मंदीराचे विश्वस्त च्या हस्ते सुद्धा तिलक व माळ घालून सत्कार करण्यात आले. कळस मंदीर श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन तिर्थ येथे पोहोचल्या नंतर मंदीरात दर्शन, पूजा, मांगलीक, प्रवचन व नंतर नवकारसी करण्यात आली.अशी माहिती श्री शांतिनाथ आदिनाथ जैन सकल संघाच्या वतीना देण्यात आली.

यावेळी श्री आचार्य भगवंतांनी आपल्या तळेगाव स्टेशन जैन सकल संघाची श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदीराची प्रतिष्ठा नंतर त्या मंदीरात (1) पहीली चैत्र परिपाठी संपन्न झाल्याचे आशिर्वाद  ( Talegaon )  दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.