Pune : निरंकारी सदगुरु माताजींचे 7 फेब्रुवारीला पुण्यात आगमन

एमपीसी न्यूज –  नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकारी ( Pune ) सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या मानव कल्याणार्थ प्रचारयात्रे दरम्यान पुणे  शहरामध्ये आगमन होत आहे . समस्त संत निरंकारी परिवारामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून हजारोंच्या संख्येने  भक्त या संत समागमाच्या तयारीला लागले आहेत.

 पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी या संत समागमाची माहिती देताना सांगितले की,  7 फेब्रुवारी बुधवार या दिवशी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत  मुकाई चौक, किवळे-रावेत या ठिकाणी हा भव्य संत समागम संपन्न होईल. मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे.

Talegaon : तळेगाव स्टेशन ते कलश मंदिर चैत्र परिपाठी (पंचतिर्थ) संपन्न

 हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण  पूर्वतयारीला लागले आहेत. सद्गुरुंच्या वाणीचा लाभ घेण्यासाठी समस्त निरंकारी परिवारामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या संत समागमाला पुण्या व्यतिरिक्त मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, संभाजीनगर  येथून हजारो च्या संख्येने श्रद्धाळू भक्त उपस्थित राहून सद्गुरूंच्या  संदेशाचा लाभ ( Pune ) घेतील.

 

https://www.youtube.com/watch?v=ipk4SAtnHOQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.