Chakan : चाकण मधील ‘ती’ घटना खून नव्हे तरअपघात

घटनास्थळाहून नागरिकांसह पोलीसही चक्रावले

एमपीसी न्यूज – चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत डोक्याचा (Chakan) चेंदा मेंदा झालेला मृतदेह आणि जवळच एक मोठा दगड मिळून आल्याची घटना गुरुवारी (दि.1) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी दिसून आलेल्या परिस्थितीमुळे पोलीस देखील चक्रावले. सदरची घटना म्हणजे खुनाचा प्रकार असल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना देखील आला. संपूर्ण चाकण शहरात खून झाल्याची वार्ता पसरली. मात्र चाकण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबींचा तपास केल्यानंतर सदरचा प्रकार म्हणजे खून नव्हे तर अपघात असल्याची बाब समोर आली.

 

चाकण पोलिसांनी या अपघात प्रकरणी बस चालक कृष्णा शिंदे ( रा. झगडेवस्ती, चाकण, ता. खेड ) यास ताब्यात घेतले आहे. चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत बुधवारी रात्री अकराच्या सुमारास  कृष्णा आपल्या ताब्यातील बस (  ( क्र. एम एच 14 जे एल 8008 ) वळवत असताना याच ठिकाणी झोपलेल्या एका इसमाच्या डोक्यावरून बसचे चाक गेले.

Kamshet : पवनानगर रोडवर अपघातात तरसाचा मृत्यू

त्यातच संबंधित अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घाबरलेला बस चालक तसाच निघून गेला. सकाळी सदर ठिकाणी डोक्याचा चेंदा मेंदा झालेला मृतदेह आणि त्या शेजारी दगड मिळून आल्याने  पोलिसही चक्रावले ; त्यामुळे हा खून की अपघात, याबाबत संभ्रम निर्माण झाला.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली चाकण गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, बापू सोनवणे, निखील शेटे, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी यांनी सूक्षम तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. संशयित बस चालकास ताब्यात घेतले.

त्यानंतर या अपघाताच्या घटनेचा उलगडा झाला आहे.  रात्रीच्या वेळी बस वळवताना लगतच झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तो ठार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघातानंतर घाबरल्याने आपण पळून गेल्याचे बस चालकाने पोलिसांना सांगितल्याचे समजते. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी बस चालकास अटक केली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.