Eye-Check up in schools: अजित पवार, अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये नेत्र तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भोसरी येथील विविध शाळांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.(Eye-Check up in schools) 1400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.

 

भोसरी परिसरातील विद्यार्थ्यांना या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी अजितभाऊ गव्हाणे युवा मंच व मित्र परिवार, भारती विद्यापीठ, माई मेडिकल फाउंडेशन यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले‌ होते. संत ज्ञानेश्वर शाळा, न्यू इंग्लिश स्कुल, सिद्धेश्वर इंग्लिश स्कुल, या तिन्ही शाळांमध्ये चौथी ते दहावीपर्यंतच्या जवळपास 1400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.  या शिबिरात 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नंबर असल्याचे आढळून आले आहे.

 

नेत्र चिकित्सक तज्ञ डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत शिबिरात सहभागी होऊन आपले डोळे तपासून घेतले. गव्हाणे यांनी यावेळी आरोग्याचे महत्व सांगितले, ‘डोळा हा आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव आहे. (Eye Check up in schools) ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर वाढला आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे डोळ्यांचे आजार वाढले आहेत. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे आहे ते डोळ्यांची तपासणी वेळोवेळी करत राहणे व आवश्यक ती काळजी घेणे.

 

 

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल येथे झालेल्या शिबिरात शाळेचे मुख्याध्यापक शामकांत कुलुमकर यांनी,  सिद्धेश्वर स्कुल येथे मुख्याध्यापिका सुजाता सावंत यांनी शिबिरास सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी वाहतूक सेल शहराध्यक्ष काशिनाथ जगताप,  कामगार सेल अध्यक्ष युवराज पवार, राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा  उपाध्यक्ष गोरख गवळी, मल्हार गवळी,  डॉ.संदिप फडतरे, डॉ. अमर भोईटे, डॉ‌. सलोनी चौधरी, डॉ. साई किरण तसेच स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सतीशचंद्र जकाते, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोकळे यांच्यासह गंगोत्री पार्क मित्र परिवार, पालक, तसेच विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिकचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.