Pune : शेतकऱ्यांनो! पीक विमा नोंदणीसाठी अतिरिक्त रक्कम देऊ नका

एमपीसी न्यूज – पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास अतिरिक्त रक्कम देऊ नये. त्याबाबत संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Pune : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष माजी उपमहापौर दीपक मानकर यांची नियुक्ती 

शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून https://pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम 40 रुपये देण्यात येते.

 

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन 2023-24 पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

 

त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम नोंदणीसाठी देऊ नये, असे कृषि आयुक्तांनी सांगितले आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.