Bhosari theft : सहप्रवासी महिलेनेच चोरले सव्वा लाखांचे मंगळसूत्र

एमपीसी न्यूज : रिक्षातून प्रवास करत असताना सहप्रवासी महिलेने दुसऱ्या प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.(Bhosari theft )ही घटना सोमवारी (दि. 5) दुपारी सावता माळा माळी मंदिर जाधववाडी ते डी मार्ट मोशी या दरम्यान घडली. याप्रकरणी महिलेने सहप्रवासी महिलेच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Kamshet news : कामशेत रेल्वे स्टेशन ते तळेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे फाटक दोन दिवस राहणार बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला सावता माळी मंदिर जाधववाडी ते डी मार्ट मोशी या दरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या.(Bhosari theft) रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सह प्रवासी महिलेने फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 30 हजार रुपये किमतीचे 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.