Pimpri : महेश लांडगे म्हणजे झेपावणारा गरुड – सिंधूताई सपकाळ

शहराचे पहिले महापौर ज्ञानेश्वर लांडगे, बाळासाहेब लांडगे यांची ग्रंथतुला

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचले आहेत. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तरी ते सहन करायला हवेत. काट्यांचा केवळ बोचण्याचा गुणधर्म आहे. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा बघून एक दिवस काटे सुद्धा बोचणं सोडतील आणि तेच एक दिवस प्रयत्नवादी असलेल्या महेश लांडगे यांची ‘महेश दादा सगळ्यांचा दादा’ अशी ओळख करून देतील. कावळा आणि चिमणी सारखं केवळ आपल्याला हवेत उडायचं नाही. तर, गरुडासारखी झेप घ्यायची आहे. महेश नावाचा गरुड आता झेप घेतोय. नागरिकांनी त्यांच्या पंखात बळ द्यायला हवं. महेशदादा झेपवणारा गरुड आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी काढले.

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.27) ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. भोसरीतील गावजत्रा मैदानात हा सोहळा पार पडला. आमदार महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा, भोसरीच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजाविणा-या विविध क्षेत्रातील 94 जणांचा गौरव करण्यात आला. तसेच शहराचे पहिले महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, भारतीय कुस्तीगार संघाचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांची ग्रंथतुला करण्यात आली.

महापौर राहुल जाधव, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, शरद सोनवणे, सभागृह नेते एकनाथ पवार, माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, अॅड. नितीन लांडगे, वसंत बोराटे, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, उत्तम केंदळे, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, अश्विनी जाधव, सारिका सस्ते, सुवर्णा बुर्डे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, प्रा. सोनाली गव्हाणे , भीमाबाई फुगे, नम्रता लोंढे, योगीता नागरगोजे, कमल घोलप, साधना तापकीर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, विजय लांडे, सागर हिंगणे, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर, अजित बुर्डे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘भोसरीच्या जडणघडणीत योगदान दिलेल्यांचा सन्मान करताना मनस्वी आनंद होत आहे. या ज्येष्ठांमुळेच आपण घडलो आहोत. त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आजपर्यंत वाटचाल करत आलो आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाने राजकारणात आलो आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मी इथपर्यंत आलो आहे’.

‘सन्मान ज्येष्ठांचा, भोसरीच्या अभिमानाचा’ या अंतर्गत भोसरीच्या जडण-घडणीत महत्वाची भूमिका बजाविणा-या विविध क्षेत्रातील 94 नागरिकांचा सन्मान करण्यात आला. प्रतिज्ञापत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शहराचे पहिले महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, भारतीय कुस्तीगार संघाचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांची ग्रंथतुला करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.