Crime news : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

एमपीसी न्यूज : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी व 10,000 रू दंड अशी शिक्षा सुनावली आहे.(Crime news) अशी माहिती पिंपरी-चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत डिसले यांनी दिली आहे.

डिसले म्हणाले की, आरोपी मंगेश भानुसे याला न्यायालयाने भा.द.वि कलम 363 नुसार 3 वर्ष सक्तमजुरी व 3,000 रुपये दंड, भादवि कलम 376(3)  व पॉक्सो कायदा कलम 4(2) नुसार वीस वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

फिर्यादी हे त्यांच्या पत्नी, आई व 16 वर्षीय मुली सोबत मारुंजी गावातील घरी राहत असताना आरोपी मंगेश भानुसे याने त्यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला फिर्यादी यांच्या संमतीशिवाय 15 जानेवारी 2020 रोजी रात्री 2 वा ते 10 वा चे दरम्यान कार मधून पळवून नेले. मारुंजी येथील कॅनॉल रोड वर गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार करून तिला भूमकर चौक येथे सोडून देऊन निघून गेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 376, 376 (2) (आई) (ज), 363 सह लैंगिक प्रधान पासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 3, 4, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 व सुधारित अधिनियम 2015 चे कलम 3(2)(va), 3(2)(v), 3(1)(w)(ii) प्रमाणे 15 जानेवारी 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Robbery : दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना केले जेरबंद

या गुन्ह्याचे तत्कालीन तपास अधिकारी सपोआ श्रीकांत मोहिते (सेवानिवृत्त) वाकड विभाग, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी फिर्यादीच्या हकीकतीनुसार परिपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध पूर्ण पुराव्यासह दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र मुदतीत मा. विशेष जिल्हा व (Crime news) अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शिवाजीनगर, पुणे यांच्या न्यायालयात सादर केले. या गुन्ह्याच्या तपास कामी त्यांना सपफौ देवराम शेळके तत्कालीन नेमणूक वाकड पोलीस ठाणे, सध्या नेमणूक तळेगाव पोलीस ठाणे व सपोफौ मिलिंद जोशी नेमणूक वाकड पोलीस ठाणे यांनी गुन्ह्याची कागदपत्रे तयार करण्यास मदत केली आहे.

तसेच त्यानंतर वेळोवेळी यातील आरोपीने न्यायालयात सादर केलेल्या जामीन अर्जात विरोध करण्याकरिता सपोआ श्रीकांत डिसले, वाकड विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे (Crime news) स्पोफौ देवराम शेळके व सपोफौ मिलिंद जोशी यांनी मुदतीत आरोपीचे जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी रिपोर्ट तयार करून सादर केले.

तसेच ही केस साक्षी पुराव्यासाठी बोर्डावर आली असता डिसले यांनी दोन्ही अंमलदार यांना न्यायालयात हजर ठेवून, फिर्यादी व पिडीत मुलगी यांचे दिलेल्या पत्त्यावर वि इतरत्र शोध घेऊन व पत्रव्यवहार करून तिला न्यायालयात हजर ठेवून पूर्तता करून घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.