Akurdi Fire : आकुर्डीत कारखान्याला भीषण आग; शेजारील शाळेने दाखवले प्रसंगावधान

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील पांढारकर नगर येथील रिअल फ्राग्रांन्सेस अगरबत्ती पुणे प्रायवेट लिमिटेड या अगरबत्तीच्या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीमुळे संपुर्ण परिसरात धूराचे लोट निर्माण झाले होते. (Akurdi Fire) आगीचे रौद्ररुप पाहता घटनास्थळी एकूण सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. आगीचे लोट व धूर दिसताच कारखान्याला लागूनच असलेल्या बीना इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत शाळेतील सुमारे 450 मुलांना शाळे बाहेर काढले.

आगीचे रौद्ररुप पाहता घटनास्थळी एकूण सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. त्याचा मार्फत आग विझवण्याचे काम करण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारखाना हा नागरी वस्तीत असल्याने कारखान्याच्या एका बाजूला बीना इंग्लिश स्कूल, दुसऱ्या बाजूला रेल्वे लाईन व दळवी नगर असा परिसर आहे. वर्दळीचा भाग असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. तसेच अग्निशमदलाच्या वतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.

पांढरकरवस्ती हा दाट लोकवस्तीचा भाग असून येथे कंपन्या व घरे आहेत. दळवीनगर रेल्वे उड्डाणपुला लगत हा परिसर आहे. पुलाच्या जवळ बैठी घरे आहेत. त्यानंतर बिना इंग्लिश मिडीयम स्कुल व त्याला लागूनच रिअल फ्रेग्रेन्सस (पुणे) प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कपंनीत अगरबत्ती व धूप बनवतात. त्याच्या शेजारी वर्धमान ग्रुप ऑफ इंडिया ही कपंनी असून ती चहापत्ती व बेकरी प्रॉडक्ट्स तयार करते.

या दोन कंपन्यांचे आगीमध्ये नुकसान झाले आहे. अंदाजे 10 वा आग रिअल फ्रेग्रेन्सस (पुणे) प्रायव्हेट लिमिटेड या कपंनीत लागली व तेथून धुराचे लोट बाहेर निघू लागले. (Akurdi Fire) येथे अगरबती व धूप तयार करण्यासाठीची जवलनशील सामग्री असल्याने आग आणखीनच धुमसली. त्यामुळे आतील कर्मचारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले.

लवकरच ही आग शेजारील वर्धमान ग्रुप ऑफ इंडिया या कपंनीत पसरली. या कपंनीतील एका महिला कामगाराने सांगितले की, शेजारील कपंनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे आम्हालाच दिसल्याने सर्व कामगार हातातले काम सोडून बाहेर पडले. आम्ही लगेच मशीन्स बंद केल्या व बाहेर निघालो.अंदाजे 15 – 16 महिला कामगार प्रत्येकी चहापत्ती व बेकरी युनिट मध्ये काम करतात. ते व इतर कर्मचारी सर्व सुखरूप बाहेर आले.

वर्धमान ग्रुप ऑफ इंडिया च्या एका कामगारांने सांगितले की, सकाळी अंदाजे 10 वा. आग लागली होती. त्यामध्ये मशीन्स, संगणक, फर्निचर व पॅकेजिंग मटेरिअल जळून गेले आहे.(Akurdi Fire) रिअल फ्रेग्रेन्सस या कपंनीत अगरबत्ती व धूप बनवण्यासाठी लागणारे रसायन ड्रम मध्ये साठवून ठेवले होते. या ड्रमचा स्फोट अधून मधून होत होता. त्यामुळे आगाचे लोट व धूर उंच आकाशात जात होता व लांब पर्यंत दिसत होता.

रिअल फ्रेग्रेन्सस व वर्धमान ग्रुप ऑफ इंडिया या कंपन्यांच्या पत्र्याच्या युनिट मधील ज्वलनशील पदार्थांना भीष्ण आग लागल्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना आत जाऊन आग विजवता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी वरचे पत्रे उचकटून त्या फटीतून पाण्याचा मारा केला.

दरम्यान कंपनी बाहेरील रस्तायावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.रस्त्यावरून ये जा करणारी वाहने थांबवून लोक आग पाहत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस रस्त्यावर लोकांना व वाहनांना जास्त वेळ  थांबू देत नव्हते.

प्रताप चव्हाण, अग्निशमन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना विचारले असता ते म्हणाले की, शहरातील विविध अग्निशमन केंद्राचे मिळून 8 अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले होते. अगरबत्ती बनवण्यासाठी केमिकल्स तेथे साठवून ठेवल्यामुळे आग परत परत पेट घेत होती. 8 अग्निशमन बंब, 60 कर्मचारी व 2 खाजगी टँकर्स च्या मदतीने दुपारी 2.30 वा आग विजवण्यात आली आहे.

चव्हाण पुढे म्हणाले की, सध्या कुलिंग चे काम चालू आहे. आता काम संपल्यामुळे 6 अग्निशमन बंब परत पाठवले आहेत.  हा औद्योगिक परिसर असल्याने एमआयडीसीचा (Akurdi Fire) एक अग्निशमन बंब बोलवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब व एमआयडीसीचा  एक अग्निशमन बंब असे एकूण तीन बंब तेथेच कुलिंग ऑपरेशन करण्यासाठी व स्टॅन्डबाय  ठेवण्यात आले आहेत.

शिक्षकांनी दाखवले प्रसंगावधान – Akurdi Fire

आगीचे लोट व धूर दिसताच कारखान्याला लागूनच असलेल्या बीना इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत शाळेतील सुमारे 450 मुलांना शाळे बाहेर काढण्यास सुरुवात केली. आग लागली तेव्हा शाळेची मधली सुट्टी होती. त्यामुळे मुले मैदानात होती, तर काही मुले वर्गात होती. शिक्षकांनी धावाधव करत सर्व मुलांना शाळेबाहेर काढत त्यांच्या पालकांशी संपर्क साधत शाळेला सुट्टी देत मुलांना घेऊन जाण्याची विनंती केली. यावेळी पालक परिसरात येवून त्यांच्या मुलांना घरी घेऊन जात आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.