Pune : रद्द केलेल्या विमान तिकीटाची भरपाई व्याजासकट ग्राहकाला द्यावी, अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाचे आदेश

एमपीसी न्यूज – विमानाची तिकिटे रद्द केल्यानंतर ई-कुपन, सेवा कराचे शुल्क वजा करून ( Pune ) उर्वरित रक्कम परत न देणे टूर कंपनीला महागात पडले आहे. तक्रारदार ग्राहकाला 2 लाख 84 हजार 14 रुपये 2019 सालापासून व्याजासह परत द्यावेत, असा आदेश पुणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे.काही कारणास्तव तक्रारदारांनी स्वतः तिकीट रद्द केले. 16 एप्रिल 2019 ला कंपनीने तक्रारदारांना ई-मेल पाठवून तिकीट रद्द केल्याचे, ई-कुपन आणि सेवा कराचे शुल्क वजा करून राहिलेल्या रकमेपैकी 2 लाख 84 हजार 14 रुपये 12  तासांमध्ये परत करण्याचे आश्वासन दिले.

Pune : पैशाचा पाऊस पाडतो म्हणत भोंदू बाबाने तरुणाचे पळवले 18 लाख रुपये

मात्र, आश्वासन न पाळता कंपनीने तक्रारदारांना रक्कम परत केली नाही. वेळोवेळी पैशांची मागणी केली असता कंपनीकडून खोटी आश्वासने देण्यात आली. नोटिशीला कंपनीने प्रतिसाद न दिल्याने तक्रारदारांनी तक्रार दाखल केली, असे त्यांनी केलेल्या दाव्यात नमूद आहे.

नोटीस मिळाल्यानंतर कंपनी वकिलामार्फत आयोगासमोर हजर झाली. मात्र संधी देवूनही त्यांनी लेखी जबाब सादर केला नाही. तक्रारदारांनी सादर केलेले शपथपत्र, लेखी युक्तिवाद, कंपनीतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद लक्षात घेत आयोगाने तक्रारदारांना 2 लाख 84 हजार 14 रुपये वार्षिक सात टक्के व्याजाने देण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, नुकसान भरपाई पोटी 30 हजार, तक्रारीच्या खर्चापोटी 5 हजार रुपये द्यावे, असे आदेशात नमूद केले (Pune ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.