Somatane : सोमाटणे येथून तरुणाकडून चार किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – सोमाटणे येथून अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Somatane) कारवाई केली. मंगळवारी (दि. 28) केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी चार किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे.

प्रवीण रमेश शेडगे (वय 30, रा. सोमाटणे गावठाण, ता. मावळ) याला गांजा विक्री प्रकरणी अटक केली आहे. त्याने हा गांजा मराठे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाच्या व्यक्तीकडून आणला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण शेडगे हा गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पवना नदीच्या कडेला छापा मारून कारवाई करत प्रवीण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 750 रुपये किमतीचा चार किलो 30 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत (Somatane) आहेत.

Nigdi : घरातील साहित्य घेण्याच्या बहाण्याने लिलाव केलेल्या मालमत्तेवर ताबा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.