Somatane : सोमाटणे फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हल्स च्या धडकेत पादच्याऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या (Somatane) पादच्याऱ्याचा टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.27) रात्री घडला.

याप्रकरणी राजू तुकाराम जाधव (वय 39 रा.सोमाटणे फाटा) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हल्स चालक अनिकेत गंगाधर पुंडगे (वय 23 रा .लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर अपघातात अंकुश रामू फाले (वय 34 रा.मुळशी) यांचा मृत्यू झाला आहे.

Smart City : कासवगतीने सुरू असलेल्या प्रकल्पांना पुन्हा मुदत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मेहुणा अंकुश हे सोमाटणे फाटा येथे पायी रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील (Somatane) टेम्पो ट्रॅव्हल्स वेगाने चालवून अंकुश याला जोरदार धडक दिली. यामध्ये अंकुश गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हल्स चालक अनिकेत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.