Talegaon Dabhade : डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या (Talegaon Dabhade) नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे,पुणे पीपल्स को ऑप बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, पतसंस्थेचे संस्थापक, सहकार भूषण बबनराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे आधारस्तंभ, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे, सल्लागार डॉ. शाळीग्राम भंडारी, महेशभाई शहा, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राहुल पंढरीनाथ पारगे, संस्थेचे सचिव अतुल राऊत, माजी उपनगराध्यक्ष वडगाव नगर पंचायत चंद्रजीत वाघमारे, पुणे पीपल्स बँकेचे तज्ञ संचालक कौस्तुभ भेगडे, संस्थेचे माजी अध्यक्ष, संचालक शरद भोंगाडे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक शंकर वाजे, निलेश राक्षे, आशिष खांडगे, अमित भसे, समिर भेगडे, दिनकर भेगडे, दत्तात्रय भेगडे, भरत पोतदार, सचिन भेगडे, अतुल काकडे, व्यवस्थापिका तस्लिम शिकिलकर आदी उपस्थित होते.

बबनराव भेगडे म्हणाले, “1992 साली संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक बेरोजगार व गरजवंतांना कर्जपुरठा करून त्यांच्या व्यवसायात उभे करण्याचे काम संस्थेने केले आहे. त्यांची आर्थिक उन्नती संस्थेने घडवली आहे. आज संस्थेची 135 कोटीची उलाढाल आहे. संस्थेची दिनदर्शिका आम्हाला हवी अशी मागणी सभासदांची होती. त्यामुळे आम्ही दिनदर्शिका तयार केली आहे.”

Smart City : कासवगतीने सुरू असलेल्या प्रकल्पांना पुन्हा मुदत

डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी अनेक सांस्कृतिक,सामाजिक उपक्रम राबवले जातात. मकरसंक्रातीला महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करून आकर्षक भेटवस्तू दिली जाते. मे महिन्यात ग्राहक मेळावा, (Talegaon Dabhade) जून महिन्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल आणि गणवेश वाटप, गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठण, दिवाळीला दीपोत्सव तसेच वैद्यकीय मदत असे विविध कार्यक्रम घेतले जातात. छोट्या-मोठ्या उद्योग व्यावसायिकांना उद्योग- व्यवसाय वाढीसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो.

यावर्षी सोमाटणे फाटा, कामशेत व देहू या ठिकाणी नवीन शाखा सुरू करणार असल्याचे संतोष भेगडे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे यांनी केले. संस्थेचे सल्लागार डाॅ शाळीग्राम भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव अतुल राऊत यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.