Pimpri : साडे सात किलो गांजा सह एकाला पिंपरी येथून अटक

एमपीसी न्यूज- साडेसात किलो गांजा सह एकाला पिंपरी येथील (Pimpri) संत तुकाराम नगर येथून अटक केली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.6) दुपारी केली आहे.

जितेंद्र मगन कोळी (वय 33 रा शिरपूर, धुळे) असे अटक आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोर उभारला होता. याची खबर विरोधी पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

Chinchwad : वेगाने गाडी चालवणे बेतले जीवावर; अल्पवयीन मुलासह अल्पवयीन मित्राचाही मृत्यू

यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 7 लाख 43 (Pimpri) हजार 800 रुपयांचा सात किलो 438 ग्रॅम वजनाचा गांजा व 15 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 7 लाख 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी हा तेथे गांजा विक्रीसाठी आल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट. अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.