Chinchwad : वेगाने गाडी चालवणे बेतले जीवावर; अल्पवयीन मुलासह अल्पवयीन मित्राचाही मृत्यू

एमपीसी न्यूज – गाडी चालवण्याचा कोणताही परवाना नसताना (Chinchwad) 17 वर्षीय मुलाने स्पोर्टस बाईक वेगात चालवून थेट झाडाला धडक दिली. या अपघातात अल्पवयीन मुलासह त्याचा पाठी मागे बसलेल्या मित्राचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात 25 ऑगस्ट रोजी चिंचवड येथे घडला होता.

याप्रकरणी सचिन कैलासचंद लोहाडे (वय 45 रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Akurdi : उलट बोलल्याच्या रागातून तरुणीने मित्रांच्या साथीने केली अल्पवयीन मुलाला कोयत्याने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा हा आरोपी मुलासह त्याच्या दुचाकीवरून जात होता. अल्पवयीन मुलाकडे कोणतेही वाहन परवाना नसताना स्पोर्टस बाईक वेगाने चालवत होता.

यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी थेट झाडावर (Chinchwad) जाऊन धडकली. यात आरोपी मुलाचा जागीच मृत्यू झाला तर फिर्यादी यांचा मुलाला गंभीर दुखापत झाली. पण त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.