चऱ्होली खुर्द येथे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या कचऱ्यास एकाच दिवशी समाजकंटकांनी लावली आग

एमपीसी न्यूज : चऱ्होली खुर्द (Charholi Khurd) येथील चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीतील वडगांव रस्ता, मरकळ रस्ता, धानोरे येथील चऱ्होलीकडे (बुद्रुक) जाणाऱ्या बाह्य वळणाच्या रस्त्यावर, पुलाजवळील (ग्रामपंचायत हद्दीत) ठिकठिकाणी असणाऱ्या कचऱ्याला (दि.28 फेब्रुवारी) काल समाजकंटकांनी आग लावली.

आग लागल्यानंतर तेथील ठिकाणावरून धूर निघून येथील परिसरात वायू प्रदूषण होत होतेच. परंतु, तेथून रहदारी करणाऱ्या सर्व नागरिकांस त्या धुराचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच, दि.1 मार्च रोजी सिद्धबेटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कुंडीसमोरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्याला समाजकंटकांकडून आग लावण्यात आली.

चऱ्होली खुर्द हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणावरील कचऱ्यास एकाच दिवशी आग लागल्याने नागरिकांमध्ये त्याबाबत चर्चा सुरू होत्या. एकाच दिवशी ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणच्या (Charholi Khurd) कचऱ्याला आग लागल्याने आश्चर्य व्यक्त होऊन त्यासंदर्भात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

Somatane : सोमाटणे येथून तरुणाकडून चार किलो गांजा जप्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.