Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनियर कॉलेज येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक रांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक मुंगसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या रांगोळी स्पर्धांमध्ये इयत्ता नववी ‘ब’ मधील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील महत्त्वाच्या आकृत्या, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण या विषयाच्या रांगोळ्या काढल्या. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक मुंगसे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व आध्यात्म यांची सांगड घालावी तसेच जीवन जगताना (Alandi) वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा हा संदेश दिला.

या कार्यक्रमासाठी विज्ञान विभाग प्रमुख अनिता गावडे, कार्यक्रमाचे प्रमुख संजय कंठाळे, ज्येष्ठ विज्ञान अध्यापक संजय उदमले, बाळासाहेब भोसले, गोविंद निळे, मनीषा कहडणे, उमेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

चऱ्होली खुर्द येथे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या कचऱ्यास एकाच दिवशी समाजकंटकांनी लावली आग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.