Dhanore: धानोरे येथील ग्रोवेल कंपनीत आग; अग्निशमन दलास आग विझवण्यास तत्काळ यश

एमपीसी न्यूज – आज 23 मार्च  शनिवार रोजी सायंकाळी 4:45  वाजता धानोरे येथील  (Dhanore) ग्रोवेल कंपनी धानोरे फाटा,पगडे वस्ती येथे आग लागल्याची माहिती आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलास मिळाली.
तात्काळ अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि तेथील आग 15 मिनिटात (Dhanore)विझविण्यात कर्मचाऱ्याना यश आले.आगीमुळे कंपनीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

 

Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सचिन पवार

आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलातील फायरमन प्रसाद बोराटे,तुळशीराम कोळपे, विनायक सोळंकी,अक्षय त्रिभुवन यांनी उत्तम कामगिरी करत दोन्ही घटनांमध्ये आग विझविण्यात यश मिळविले.याबाबत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.