Wakad: पार्सल कम्टममध्ये अडकले आहे त्यात ड्रग्स असल्याची भिती घालून नागरिकाला तब्बल 10 लाख रुपयांना लुटले

एमपीसी न्यूज- तुमच्या नावचे पास्रल असून त्यात पासपोर्ट व ड्रग्स (Wakad)आहेत अशी बतावणी करुन नागरिकाला यातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने  सुमारे 10 लाख रुपयांना लुटले. हा सारा प्रकार बुधवारी (दि.20) वाकड येथे घडला आहे.
याप्रकरणी शुक्रवारी संबंदित नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद  (Wakad)दिली. त्यावरून  8157908668 मोबाईल क्रमांक धारक, संतोष कुमार व दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींने संबंधीत मोबाईल क्रमांकावरून फोन केला व फेडेक्स इंटरनॅशनल कुरीयर मधून संतोष कुमार बोलत असल्याचे सांगितले.  एक पार्सल मुंबई ते बँकॉक द्यायचे होते.
ते तुमच्या नावावर आहे. ते ब्लॉक कऱण्यात आले असून त्यात 5 पासपोर्ट, 3 क्रेडीट कार्ड,1 लॅपटॉप कपडे व 144 ग्रॅम एमडी ड्रग्स आहे. तुमचा कॉल मुंबई क्राईम ब्रँचकडे ट्रान्सफर करत असल्याचे सांगितले. फिर्यादी या साऱ्या प्रकाराने  घाबरले.

यावेळी फिर्यादी यांना यासाऱ्या प्रकारातून बाहेर काढू मात्र याबाबात घरी पत्नी किंवा इतरांना काहीही सांगू नका असे सांगण्यात आले. यावेळी एचडीएफसी बँकेत स्वप्नील दरबे यांच्या नावाने खाते आहे. या खात्यावरून  मनी लॉन्ड्रिंग व ह्यूमन ट्राफीकींग होत आहे.

LokSabha Elections 2024 :  भोसरीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सुरुवात 

त्यात तुमच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही ंसंशयीत आहात अशी भीती घालण्यात आली. यावेळी  तुम्हीऑफीसला जाऊ नका कोणाला काही सांगू नका असे सांगितले. पुढे त्यांनी फिर्यादीला एक बँक अकाऊंट क्रमांक देवून त्यावर 9 लाख 99 हजार 999 रुपये भरा यातून तुमची सुटका करू असे सांगितले. पैसे घेत फिर्यादी यांची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.