LokSabha Elections 2024 :  भोसरीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सुरुवात

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (LokSabha Elections 2024)खासदार, संभाव्य उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला आज (शनिवार) पासून सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाच्या पदाधिका-यांनी तुतारीचा नाद घुमवून  प्रचाराला सुरुवात केली.

भोसरीतील पीएमटी चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार(LokSabha Elections 2024) अर्पण करुन प्रचाराला सुरुवात केली. भोसरीगावठाण, भाजी मंडई, व्यापा-यांना प्रचारपत्रके वाटली.

Pimpri : मंत्रालयावरून उडी मारणाऱ्या वडापाव विक्रेत्यांस सर्वतोपरी सहकार्य करणार – नखाते

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, कोल्हे यांचे बंधु सागर कोल्हे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, सरचिटणीस जयंत शिंदे, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव, ख्रिश्चन सेलचे अध्यक्ष शौल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयुर जाधव, काँग्रेसचे सरचिटणीस हरिभाऊ डोळस, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, राजू खंडागळे, योगेश सोनावणे, राहुल धनवे, विवेक विधाते, अमित लांडगे, संजय पडवळ, विजय पिरंगुटे, सुदाम शिंदे, सुशांत खुरासने, अशोक तनपुरे, शोभा साठे, वंदना आराख, कविता कोंडे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष कामठे म्हणाले की, भोसरीतून डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. खासदार डॉ. कोल्हे हे उर्वरित विधानसभा मतदारसंघात प्रचार करत आहे. भोसरीची जबाबदारी आम्ही घेतली आहे. भोसरीतील जनता कोल्हे यांच्या कामावर समाधानी आहे. त्यांनी शेतकरी, सर्व सामान्यांचे प्रश्न लोकसभेत मांडले. बैलगाडा शर्यत सुरु केली. भोसरीतून त्यांना मताधिक्य दिले जाईल.

दिवस कमी असल्याने पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही काम सुरु केले आहे. प्रत्येक प्रभागनिहाय प्रचार केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन दिवस दिले जाणार आहेत. काँग्रेस, ठाकरे गटाचे कार्यकर्तेही प्रचारात सहभागी होतील. लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून खासदार डॉ. कोल्हे यांचा विजय निश्चित आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.