Pimpri : मंत्रालयावरून उडी मारणाऱ्या वडापाव विक्रेत्यांस सर्वतोपरी सहकार्य करणार – नखाते

एमपीसी न्यूज – बोरिवली परिसरातील वडापावच्या गाडीवर कारवाई झाल्यानंतर महापालिका प्रशासन  एक वर्षापासून (Pimpri )जाणीवपूर्वक त्रास देत असून  गाडी परत दिली जात नव्हती म्हणून वडापाव विक्रेते ॲडविन बंगेरा  यांनी 18  मार्च रोजी मंत्रालयात जाळीवर उडी मारून आंदोलन केले.

 

त्यानंतर विक्रेत्यांचे साहित्य परत द्यायला सुरुवात झाली. वास्तविक हा आक्रोश व  भावना महाराष्ट्र राज्यातील (Pimpri )असंख्य विक्रेत्यांची असून ती खदखद त्यांनी व्यक्त केली. बंगेरा यांना  कायदेशीर लढाईसह कायदेशीर लाभ मिळवून देण्यासह सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नॅशनल हॉकर फेडरेशनचे काशिनाथ नखाते यांनी दिली.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, शहीद भगतसिंग हॉकर्स  युनियन तर्फे  बंगेरा यांच्याशी सविस्तर चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी महाराष्ट्र हॉकर फेडरेशनचे खजिनदार अखिलेश गौड, निमंत्रक सखाराम केदार,विकास मोरे,संजय कुशवाहा, विनय लींबाचिया,विनय गुप्ता,योगेश गौड़,इरफान चौधरी आदी उपस्थित होते.

नखाते म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील  सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पथ  विक्रेता कायद्याची अंमलबजावणी हि प्रभावीपणे व्हावी यासाठी  नमूद सर्व संघटना प्रयत्न करत असून वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, उपोषण करीत आहेत.

 

मात्र राज्य सरकारला जाग येत नसून राज्य सरकार हे केवळ मॉल आणि मार्ट अशा धनिकांसाठी काम करत असून गोरगरिबांना वारंवार वाऱ्यावर  सोडण्याचे धोरण आहे. कोव्हिडनंतर अनेक विक्रेत्यांनी कर्ज काढून आपला व्यवसाय सुरू ठेवलेला आहे आणि एकीकडे महापालिका स्वनिधी अंतर्गत  10,20,50हजार  कर्ज देते आणि दुसरीकडे कारवाई करते ही दुटप्पी भूमिका आहे.

 

 

Dehuroad: भर रस्त्यात तरुणांना मारहाण करत दहशत  पसरवणाऱ्या तरुणाला अटक

महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या पथारी,हातगाडी, टपरी, स्टॉल धारकावर अन्याय होत असून तो दूर करण्याचे काम संघटनात्मक रित्या सुरू असून,  यातून अनेक ठिकाणी दिलासा मिळालेला आहे.

 

बंगेरा यांनी कायदेशीर मार्गाचा अधिक अवलंब करावा. अखिलेश गौड म्हणाले की, कायद्याची  अंमलबजावणी होत नाही व कारवाई सुरू आहे याबाबत नगर विकास विभागाच्या सचिवाची नुकतीच बैठक झालेली आहे त्यांच्याकडून अपेक्षित आदेश होणे गरजेचे आहे.  मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील सर्वच महानगरपालिका क्षेत्रामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नगरपालिका महानगरपालिका संचालनालयाच्या प्रमुखांची ही पुढील आठवड्यात त्वरित बैठक घेण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.