Dehuroad: भर रस्त्यात तरुणांना मारहाण करत दहशत  पसरवणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज –  गप्पा मारत थांबलेल्या दोन तरुणांना मारहाण (Dehuroad)करत भररस्त्यात गोंधळ घालून दहशत पसरवल्या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) देहुरोड येथे घडली आहे.
 
आकाश पिल्ले (वय 23 रा. देहुरोड) असे अटक आरोपीचे (Dehuroad)नाव असून याप्रकरणी सुधीर हनुमंता तेलगु (वय 20 रा. देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे आतोभाऊ हे गप्पा मारत असताना दोन अनोळखी इसम आले व त्यांनी फिर्यादी यांच्या आतेभावाला  मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांच्या हातावर देखील धारदार शस्त्राने वार करत जखमी केले.

 

Charholi Budruk: च-होली बुद्रुक येथील द्वारका हॉटेल समोर ट्रकला आग

यावेळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यावरून देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.