Pune news: एकवीस वर्षानंतर तुरुंगातून सुटलेल्या कैद्याला दिली ‘भेट’

'Gift' given to a prisoner who was released from prison after 21 years.

एमपीसी न्यूज – रागाच्या भरात झालेल्या एका चुकीपोटी त्याला तुरुंगात येऊन खितपत पडावे लागले. थोडीथोडकी नाही तर तब्बल एकवीस वर्षे त्याने शिक्षा भोगली. आणि शिक्षा भोगून तो बाहेर पडला तेव्हा त्याला पुढील उदरनिर्वाहासाठी एक जर्सी गाय आणि कालवड भेट देण्यात आली. 

पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्यावतीने तुरुंगातून शिक्षा भोगून आलेल्या कैद्यांना पुढील आयुष्य जगणे सुकर व्हावे यासाठी प्रेरणा पथ हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील एका बंदीवानाला शुभारंभ लॉन्स येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात ही जर्सी गाय कालवड भेट देण्यात आली.

या गायीच्या माध्यमातून नंदू शंकर पवार या कैद्याने आपले नवीन आयुष्य सुरू केले आहे. गाईच्या साह्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे.

नंदू पवार आणि त्यांचा मुलगा श्याम पवार यांनाही गाय आणि कालवड देण्यात आले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे कारागृहचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद म्हणाले, प्रेरणा पथ या उपक्रमाच्या माध्यमातून बंदी आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरु करू शकतात आणि त्यांच्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळत आहे.

हा उपक्रम केवळ पुण्यातील एका कारागृह पुरता मर्यादित न राहता राज्यभर राबविण्यात यावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व मदत करण्यात येईल. समाजात असे चांगले बदल देखील आदर्श निर्माण करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.