Chikhali : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून गॅस कटरने आरबीएल बँकेचे एटीएम फोडले; 8 लाखांची रोकड पळवली

Break-in RBL Bank's ATM in Rupinagar, 8 lakh cash was stolen.

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी आरबीएल बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून 7 लाख 99 हजार 900 रुपयांची रोकड पळवली. दरम्यान चोरट्यांनी ओळख पटू नये यासाठी एटीएम सेंटर मधील सीसीटीव्हीवर स्प्रे मारला. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास तळवडे रोडवर हुमा बेकरीजवळ घडली.

अजय लक्ष्मण कुरणे (वय 36, रा. आळंदी रोड, पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर येथे तळवडे रोडवर हुमा बेकरीजवळ आरबीएल बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम सेंटर फिर्यादी यांच्या सीएएमएस कंपनीच्या अखत्यारित येते.

_MPC_DIR_MPU_II

रविवारी पहाटे सव्वाचार वाजता अज्ञात चोरटे एटीएम सेंटरमध्ये आले. त्यांनी सेंटर मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले. एटीएम मधून चोरट्यांनी तब्बल 7 लाख 99 हजार 900 रुपयांची रोकड चोरून नेली आहे.

रविवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1