Pune news: कोरोना काळात पॅरोलवर सुटलेल्या सराईताकडून चार गुन्हे, पाचव्या गुन्ह्याच्या तयारीत असताना जेरबंद

Three members of a gang were arrested for preparing to rob a petrol pump.

एमपीसी न्यूज -Covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येरवडा कारागृहातील कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले. त्याचाच परिणाम असा झाला की शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यातील दोघेजण हे कोरोना काळात पॅरोलवर सुटून तुरूंगातून बाहेर आलेले आहेत. 

संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय 26), अमर नंदकुमार चव्हाण (वय 28) आणि अक्षय रवींद्र कांबळे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

त्यांचे दोन साथीदार बाळासाहेब चोरगे आणि चिरंजीव थोरात हे पोलिसांना पाहून पळून गेले आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते एकत्र जमले होते.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, कुकरी, मसाला पावडर, मोबाईल फोन असा 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोन्या उर्फ संतोष विकारे याच्याविरोधात यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अग्निशस्त्र बाळगणे यासारख्या तब्बल 18 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. कोरोना काळात तो नुकताच तुरुंगातून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता.

बाहेर आल्यानंतरही त्याने चार गुन्हे केले आहेत. दुसरा आरोपी अमर चव्हाण याच्या विरोधातही खून, खुनाचा प्रयत्न यासारखे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.