Pimpri corona update : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 352 रुग्ण; 28 रुग्णांचा मृत्यू

Today new 352 corona patients in Pimpri Chinchwad, 28 deaths.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 11) 352 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 83 हजार 785 झाली आहे. दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून 383 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 2 हजार 655 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 383 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 78 हजार 149 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पिंपळे सौदागर (69 वर्ष), थेरगाव (60 वर्ष), काळेवाडी (64 वर्ष), आकुर्डी (79 वर्ष), नेहरुनगर (80 वर्ष) मोरवाडी (51 वर्ष), रहाटणी (50 वर्ष), निगडी (72 वर्ष, 49 वर्ष), चिंचवड (89 वर्ष), नेहरुनगर (65 वर्ष), भोसरी (66 वर्ष), आकुर्डी (74 वर्ष), चिखली (41 वर्ष), चिंचवड (68 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले 13 रुग्ण रायगड (61 वर्ष), कामशेत (40 वर्ष), अहमदनगर (52 वर्ष), खेड (48 वर्ष, 72 वर्ष), आळंदी (55 वर्ष), धनकवडी (58 वर्ष), कात्रज (71 वर्षे), फुरसुंगी (30 वर्ष), गोखले नगर (65 वर्ष), देहूरोड (71 वर्ष), देहूगाव (55 वर्ष), शिरगाव (70 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 12 रुग्णांचे आज शहरात निदान झाले आहे. सध्या 474 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 559 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 196 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.